- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत ब्राम्हणवाडा (ता.मालेगाव) येथे करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी दाखल तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी १३ जून २०१९ रोजी मालेगाव गटविकास अधिकारी व तहसीलदारांची समिती स्थापन करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. असे असताना तो आदेश पायदळी तुडवत दोषींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. जिल्हा परिषदेने याच प्रकरणात ४ शासकीय कर्मचारी निलंबित, ४ कंत्राटी कर्मचाºयांना कार्यमुक्त करून तत्कालिन गटविकास अधिकाºयाची विभागीय चौकशी प्रस्तावित केली, हे विशेष.मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी संदिप कोटकर यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता झाली. नाला सरळीकरण, शेततळे निर्मिती, वृक्ष लागवड कामांची मजूरांकडून मागणी नसतानाही चुकीच्या पद्धतीने तथा बोगस मजूर दाखवून परस्पर मस्टर काढणे, प्रस्तावित आराखड्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात नाला सरळीकरणाची कामे सुरू करून शासकीय निधीचा अपव्यय करणे, अल्पवयीन मुलांना मजूर दाखवून त्यांच्या नावे जॉबकार्ड तयार करणे यासह इतरही गंभीर स्वरूपातील घोटाळे झाले आहेत. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील गोपिनाथ शिवाजी नागरे यांनी २७ मार्च २०१९ आणि २८ मे २०१९ असे दोनवेळा ब्राम्हणवाडा येथे रोहयोच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. त्याची दखल घेवून जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी १३ जून २०१९ च्या पत्रान्वये मालेगावचे विद्यमान तहसीलदार आणि गटविकास अधिकाºयांची समिती स्थापन करून ब्राम्हणवाडा येथील कामांची चौकशी करून दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी व त्याचा अहवाल ७ दिवसांत पाठवावा, असे स्पष्ट आदेश दिले होते; मात्र त्याचे पालन अद्यापपर्यंत झाले नाही.यादरम्यान विभागीय आयुक्तांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार मालेगाव तहसीलदारांकडून सीईओंना प्राप्त झालेल्या अहवालात दोष सिद्ध झाल्याने चार प्रशासकीय कर्मचाºयांना निलंबित; तर चार कंत्राटी कर्मचाºयांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली; मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. ब्राम्हणवाडा येथे रोहयोच्या कामांमध्ये घोटाळा करणाºयांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्याचे पालन मात्र अद्यापपर्यंत झालेले नाही. यासंदर्भात मालेगाव तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यात आला असून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- शैलेश हिंंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम ब्राम्हणवाडा येथील रोहयो घोटाळा प्रकरणासंबंधी १३ जून रोजी पारित झालेले जिल्हाधिकाºयांचे पत्र प्राप्त झाले असून त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाईल. याप्रकरणी दोषींवर निश्चितपणे गुन्हे दाखल होतीलच.- रवि काळेतहसीलदार, मालेगाव
रोहयो घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 6:13 PM