गायरानवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:57 PM2018-10-07T17:57:45+5:302018-10-07T17:59:04+5:30

पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्यामुळे १० आॅक्टोबर रोजी मानोरा येथे गुराढोरांसह मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी दिला.

Avoiding police settlement for remove encroachment | गायरानवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ

गायरानवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील कारखेडा येथील शासनाच्या ई क्लास जमिनीवील अतिक्रमण काढण्यासाठी ग्राम पंचायतने रितसर बाबी पुर्ण करीत पोलीस बंदोबस्त मागितला आहे. मात्र, अद्याप पोलीस बंदोबस्त मिळाला नसल्यामुळे १० आॅक्टोबर रोजी मानोरा येथे गुराढोरांसह मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी दिला.
कारखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक नागरिकांनी शासनाच्या ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहे. काहींनी या जमिनीवर ताबा केला तर काहींनी वीटभट्ट्यांची दुकानदारी सुरू केली. यामुळे जनावरांच्या चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्राम पंचायतने रितसर मासीक सभेचे ठराव, ग्रामसभेचे ठराव घेतले तसेच अतिक्रमकांना नोटीसही बजावली. मात्र, अतिक्रमण काढण्यात आले नाही. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला तसेच यासंदर्भात २७ आॅगस्ट ते ५ आॅक्टोबर या दरम्यान पाच वेळा पत्रव्यवहारही केला. परंतू, पोलीस बंदोबस्तही मिळाला नाही.
पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी केला.  दोन दिवसात पोलीस बंदोबस्त दिला नाही तर १० आॅक्टोबर रोजी मानोरा येथे गुराढोरांसह मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी दिला.

Web Title: Avoiding police settlement for remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.