विदर्भात होणार छत्रपतींच्या इतिहासाचा जागर ; मालेगाव तालुक्यातून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:11 PM2018-03-16T14:11:24+5:302018-03-16T14:11:24+5:30

मालेगाव:  विदर्भात असलेले किल्ले गड यांचे संवर्धन तसेच त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर होणार आहे.

awairness about history in Vidarbha; Starting from Malegaon taluka | विदर्भात होणार छत्रपतींच्या इतिहासाचा जागर ; मालेगाव तालुक्यातून प्रारंभ

विदर्भात होणार छत्रपतींच्या इतिहासाचा जागर ; मालेगाव तालुक्यातून प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराजांची राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन वाशिम जिल्ह्यात शौर्य शंभू इतिहास संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळील गाविलगड, नरनाळा, लोणार, सिंदखेडराजा,चंद्रपूर यासह विदर्भातील विविध गड व किल्ले यांची माहिती इतिहास लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. शौर्य शंभूचा शिलेदार या नावाने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे त्या माध्यमातून ऐेतिहासिक स्थळांची भ्रमंती सुरू करण्यात येणार आहे.

मालेगाव:  विदर्भात असलेले किल्ले गड यांचे संवर्धन तसेच त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर होणार आहे. शौर्य शंभू संशोधन या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून,  शौर्य शंभूचा शिलेदार या नावाने त्याची सुरुवात मालेगाव येथून करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन वाशिम जिल्ह्यात शौर्य शंभू इतिहास संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून विदर्भातील भूमिती भूमीचा इतिहास लोकांसमोर मांडणे तसेच त्याची माहिती समजावून सांगणे ते संवर्धन करणे सोबतच पुरातन गड-किल्ले यांचे संवर्धन करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळील गाविलगड, नरनाळा, लोणार, सिंदखेडराजा,चंद्रपूर यासह विदर्भातील विविध गड व किल्ले यांची माहिती इतिहास लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. शौर्य शंभूचा शिलेदार या नावाने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे त्या माध्यमातून ऐेतिहासिक स्थळांची भ्रमंती सुरू करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक १७ व रविवार दिनांक १८ या दोन दिवसांत गाविलगड येथील किल्ल्यांची भ्रमंती केल्या जाणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील स्वत:च सोबतच आज पाच राज्यातील शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा अभ्यास केल्या जाणार आहे 

Web Title: awairness about history in Vidarbha; Starting from Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.