मागासवर्गीय वस्ती समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:51+5:302021-01-08T06:11:51+5:30

---------- गोमुखेश्वर संस्थानवर स्वच्छता अभियान इंझोरी: मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोमुखेश्वर संस्थानवर गत आठवड्यात विविध ...

Backward class problems abound | मागासवर्गीय वस्ती समस्यांच्या विळख्यात

मागासवर्गीय वस्ती समस्यांच्या विळख्यात

Next

----------

गोमुखेश्वर संस्थानवर स्वच्छता अभियान

इंझोरी: मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोमुखेश्वर संस्थानवर गत आठवड्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामुळे मंदिर परिसरात घाण,कचरा पसरला होता. ही बाब लक्षात घेत गावातील युवा मंडळीने बुधवारपासून परिसरात स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.

----------

पोहरादेवी परिसरात कोरोना जनजागृती

पोहरादेवी: जिल्ह्यात पुन्हा वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता मानोरा तालुक्यातील पोहरादेवी आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून ग्रामस्थांची तपासणी करण्यासह ग्रामस्थांत जनजागृती सुरू केली आहे. मंगळवारी ही मोहीम राबविण्यात आली. पुढेही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

--------------------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

मेडशी: वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मेडशीमार्गे वाशिम-अकोलाकडे येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून मेडशी येथे केली जात आहे. या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. बुधवारी परिसरात १२ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

===Photopath===

070121\07wsm_3_07012021_35.jpg

===Caption===

मागासवर्गीय वस्ती समस्यांच्या विळख्यात

Web Title: Backward class problems abound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.