शहरातील मुख्य रस्ता वाशिम नाका ते कालूशा बाबा दर्गा या १०० मीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली झाली आहे . या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, धुळीचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील अंतर्गत रस्ता ही परिस्थिती काही वेगळी नाही. सिव्हील लाईन ते जनता कॉलेज दरम्यानच्या रस्त्याची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. याच मार्गावर तहसील कार्यालयाची मागील बाजू व दिवाणी न्यायालय ही महत्वाची कार्यालये आहेत. या मार्गावर दोन शाळासुद्धा आहेत. असे असतानाही प्रशासनाचे या रस्त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. ज्या भागात लोकवस्ती नाही, अशा ठिकाणी प्रशासनाने रस्त्याची कामे केली, परंतु सतत वर्दळ असणाऱ्या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप शहरवासी करीत आहेत. दरवर्षी विकासासाठी शासनाकडून नगर परिषदेला कोट्यवधींचा निधी येतो परंतु निधीचा वापर योग्य ठिकाणी होत नसल्यामुळे रस्त्याची दुर्दशा कायम आहे. शहरातील बस स्टँड परिसरामागील रस्त्याची वाईट परिस्थिती आहे. या रस्त्यावर सतत वाहने धावतात. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची तसदी घेण्यात येत नसल्याने नागरिकात नाराजीचे वातावरण आहे.
रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:34 AM