या वर्षी हा सन्मान राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्याम वानखडे यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार जाधव, तालुका आरोग्य निरीक्षक राजेंद्र मानके, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, प्राचार्य एन. एस. ठाकरे, प्राचार्य बी. एस. कव्हर, सरपंच सोनाली बबनराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील मुलींना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील क्रीडा गुण विकसित करत राज्य, राष्ट्रीय पातळीवर कबड्डीसारख्या खेळात मुलींनी रौप्य, कांस्य पदकाची कमाई करीत खेळ नैपुण्य जपत शाळेचा व मानोरा तालुक्याचा नावलौकिक वाढवला.
क्रीडा क्षेत्रातील देदीप्यमान कार्य केल्याने हा सन्मान करण्यात आला.
याबद्दल कन्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी तथा संस्थाध्यक्ष चंदनसार रोठे यांच्या वतीने प्रा. संकेत रोठे, मुख्याध्यापिका रजनी मांडवगडे, मनोज राठोड, तालुका क्रीडा संयोजक पी.पी. देशमुख यांनी वानखडे यांचे अभिनंदन केले.