सावधान, ‘स्क्रीन टायमिंग’ने वाढतोय अंधूकपणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 06:09 PM2020-10-28T18:09:30+5:302020-10-28T18:09:36+5:30
‘मायोपिया’ म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे.
वाशिम : कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम यामुळे ‘स्क्रीन टायमिंग’ वाढला आहे. परिणामी, जिल्ह्यातही ‘मायोपिया’ म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे.
कोरोनामुळे सर्व जगच बदलून जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च ते मे या महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. या दरम्यान पालकांसह विद्यार्थीदेखील घरीच होते. त्यामुळेर् िटव्ही बघणे, संगणक, लॅपटॉप, मोबाईल आदीचा वापर वाढला. कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना अंमलात आली. अनेकजणांनी घरी राहूनच शासकीय, निमशासकीय कामकाज हे मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून केले. आजही काही जण ‘वर्क फ्रॉम होम’नुसार काम करतात. विद्यार्थीदेखील आॅनलाईन वर्गामुळे अधिकाधिक वेळ संगणक, मोबाईलचा वापर करतात. एकंदरित पूर्वीच्या तुलनेत आता ‘स्क्रीन टायमिंग’ वाढल्याने आपसूकच डोळ्याच्या समस्याही निर्माण होत आहे. स्क्रीन टायमिंगने अंधूकपणा वाढविला आहे. जवळच्या वस्तू सहज दिसत असल्या तरी दूरचे दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संगणक, मोबाईल, लॅपटॉप, टिव्हीचा मर्यादेपेक्षा जास्त वापर, जीवनसत्वयुक्त आहाराचा अभाव, नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष यामुळे मायोपिया आजार वाढत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्यामुळेदेखील मायोपिया होऊ शकतो, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टिव्ही आदीचा मर्यादेपक्षा जास्त वापर झाला तर डोळ्याच्या समस्या निर्माण होतात. चष्म्याच्या नंबर वाढणे, अंधूकपणा, डोळ्यात कोरडेपणा जाणवणे, डोळ्यात आग होणे अशा समस्या जाणवतात. मोबाईल, संगणक, लॅपटॉपचा वापर हा मर्यादेतच असावा.
- डॉ. दीपक शेळके,
नेत्रतज्ज्ञ वाशिम
‘स्क्रिन टायमिंग’ वाढल्याने अंधूकपणा यासह डोळ्याच्या विविध समस्या निर्माण होत असल्याचे रुग्ण येत आहेत. डोळ्याच्या समस्या टाळण्यासाठी ‘स्क्रिन टायमिंग’वर नियंत्रण असणे आवश्यक आहे. याबरोबरच जीवनसत्वयुक्त आहार, नियमित व्यायामही असावा.
- डॉ. स्वीटी गोटे,