रिसोड : येथील श्री संत सावता माळी गणेश मंडळ व जय लखमा डीएमएलटी पॅरामेडिकल कॉलेजच्या वतीने गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ७० दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान करण्यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
सावता माळी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी लोकोपयोगी उपक्रम राबविल्या जातात. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सामाजिक संघटना, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत सावता माळी गणेश मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले. यशस्वीतेसाठी भागवतराव गवळी, अरुण मगर, पीएसआय विलास मुंडे, महादेवराव ठाकरे, सावता माळी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुभाष ईरतकर, देवीदास मडके, बाबू मगर, दत्ता मगर, जय लखमा डीएमएलटी कॉलेजचे अध्यक्ष सचिन गांजरे तसेच औरंगाबाद येथील लोकमान्य ब्लड बँकेचे कर्मचारी व सावता माळी गणेश मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.
160921\screenshot_2021-09-16-18-58-23-76.png
रिसोड : रक्तदान शिबीरामध्ये सहभागी झालेले सावता माळी गणेश मंडळाचे सदस्य