लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी ग्रामीण भागांत काही पोलीस चौक्या उभारल्या होत्या. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचा समावेश होता. आता मात्र या चौकीच्या इमारतीचे केवळ भग्नावशेष उरले असून, ते ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी जागवत आहेत. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ ही ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतून ही संकल्पना आली आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ अशा आकर्षक नावाखाली ब्रिटिशांनी त्यांच्या आज्ञेत राहण्यासाठी व भारतीय लोकांना दडपण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी याचा वापर केला. स्वातंत्र्य आंदोलन व चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर कठोरपणे दडपण व नियंत्रण ठेवण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग केला. यासाठीच त्यांनी ग्रामीण भागांत पोलीस चौक्यांची उभारणी केली होती. यात वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचाही समावेश होता. गावचे पाटील जयराम भोयर यांच्या शेतातील जागेत ही पोलीस चौकी उभारण्यात आली होती. या चौकीच्या उभारणीनंतर काही वर्षे येथे ब्रिटीश पोलिसांचे कामकाज चालले. नंतर ही चौकी मंगरुळपीर तालुक्यातीलच आसेगाव येथे हलविण्यात आली. तेव्हापासून बिटोडा येथील इमारतीचा वापर बंद झाला. आता या इमारतीचे केवळ भग्नावशेष उरले आहेत. हे भग्नावशेष ब्रिटीशांच्या कायदा-सुव्यवस्थेच्या आठवणी जिवंत करतात.
ईमारतीचे भग्नावशेष जागवतात ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 1:50 PM