आठवडाभरापासून बसफेऱ्या अनियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:49+5:302021-01-08T06:11:49+5:30
कारंजा-मानोरा मार्गावर कारंजा आगाराच्या १० पेक्षा अधिक बसफेऱ्या सुरू आहेत. दर अर्धा, एक तासाला या मार्गावर एसटीची बस धावताना ...
कारंजा-मानोरा मार्गावर कारंजा आगाराच्या १० पेक्षा अधिक बसफेऱ्या सुरू आहेत. दर अर्धा, एक तासाला या मार्गावर एसटीची बस धावताना दिसते. या बसफेऱ्यांचा मार्गावरील गावच्या ग्रामस्थांना मोठा आधार असतो. या सर्व बसफेऱ्या सध्याही सुरू आहेत; परंतु कारंजाकडून मानोराकडे वेळेत जाणाऱ्या फेऱ्या परतीच्या प्रवासात तास, दीड तास विलंबाने येत आहेत. त्यामुळे या बसफेऱ्यांवर अवलंबून असलेले विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली असून, त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसत आहे.
-------
कोट: सर्व बसफेऱ्यांचे योग्य नियोजन असून, सर्व बस वेळेत ये-जा करीत असतात. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे एखाद दोन बसफेऱ्यांना विलंब होतो. तथापि, हा प्रकार वारंवार घडू नये म्हणून चालक-वाहकांना सूचना देण्यात येतील.
-उमेश न्हावकर,
आगार व्यवस्थापक, कारंजा.