लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : शेतकºयांच्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवार, २९ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘बंद’ला व्यापाºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज येथील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याचे दिसून आले. यामधून मेडिकल आणि दवाखाने वगळण्यात आले होते. शासनाने शेतकºयांना एकरी ५० हजार रुपयांचे कर्ज तत्काळ वाटप करावे, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दुप्पट भाव देण्यात यावा, आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी शनिवारी शिरपूरची बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले जोते. त्यास प्रतिसाद देत व्यापाºयांनी दिवसभर बंद पाळला. दरम्यान, शेतकºयांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना ३१ डिसेंबरनंतर पुन्हा एकवेळ जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले.
शिरपुरकरांनी पाळला कडकडीत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 5:34 PM