पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:56 AM2021-07-24T10:56:07+5:302021-07-24T10:56:16+5:30
Celebrate Gurupournima in a simple manner at Pohardevi : श्री संत महान तपस्वी रामराव बापू यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त भोग विधी, पाळणा पूजा समाधी स्थळी संपन्न झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानाेरा : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमिवर साधेपणाने साजरा करण्यात आला.
२३ जुलै रोजी गुरुवर्य श्री संत महान तपस्वी रामराव बापू यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त भोग विधी, पाळणा पूजा समाधी स्थळी संपन्न झाला.
यावेळी महंत परमपूज्य बाबुसिंग महाराज व गुरुवर्य महंत शेखर महाराज यांच्या हस्ते पूजेचे कार्यक्रम संपन्न झाले असता आ. संजय राठोड यांची उपस्थिती होती तसेच महंत सुनील महाराज,बलदेव महाराज,संजय महाराज,अनिल राठोड वाई, विजय पाटील, राजाराम महाराज, हरिचंद महाराज, रमेश महाराज, गणेश महाराज, विनोद महाराज, मोहन महाराज,नेहरु महाराज, राजाराम साहेब, प्रेमदास महाराज व भाविक भक्त उपस्थित होते.
देवी जगदंबा मंदिरात महंत कबीरदास महाराज यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली. भक्तिधाम येथे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा करून भोग लावला. कोविड १९ मुळे येथे कलम १४४ लागू केल्याने भाविक भक्त आले नाहीत. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.