००००००००००००००
बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचीच गर्दी
शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजुला वाहने ठेवली जात आहेत. त्यात रस्त्यालगत फेरीवाले उभे राहात असल्यामुळे रस्ताच दिसेनासा होत आहे. बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने फेरीवाले रस्त्यावर उभे राहतात. पालिका अतिक्रमण विभाग, वाहतूक विभाग, पोलिसांची कारवाई सुरू असली, की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात. कारवाई आटोपली की, पुन्हा रस्त्यांवर येतात. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.
160921\32591644-img-20210916-wa0009.jpg
मंगरुळपीर येथील सिमेंट रस्ते बनले 'वाहनतळ'
मंगरुळपीर ता १६/(ता प्र) गुळगुळीत सिमेंट रस्ते हे रहदारीसाठी आहेत की 'वाहनतळ ' म्हणून त्यांचा वापर करण्यासाठी ते तयार करण्यात आले ते शहरातील मुख्य रस्त्यांची स्थिती बघून कळतच नाही , इतपत नियोजनाचे तीन - तेरा वाजले आहेत . एकूणच काय तर पार्किंगबाबत बेताल कारभार सुरू आहे .
सध्या शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे . अशात रस्त्यांवरून वाहने घेऊन जातानाच काय , चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते .वाहने एकमेकांना धडकणे , धडक बसणे , लहान - मोठे अपघात तर ठरलेलेच आहे . याला कारण वाहनतळाबाबत अचूक व योग्य नियोजन नसणे हेच आहे . नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचे नियोजन करताना फुटपाथसाठी जागाच सोडली नाही . ज्या ठिकाणी फुटपाथसाठी जागा सोडली , त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला . त्यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही . परिणामी रस्ते वाहनतळ बनले .यातच मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजूला वाहने ठेवली जात असल्यामुळे लहान झालेल्या रस्त्यांचा आकार फेरीवाले उभे राहत असल्यामुळे आणखीनच संकुचित झाला आहे . त्यामुळे रस्त्यावरून केवळ पायीच चालायचे काय , असा प्रश्न पडतो . फेरीवाले बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने रस्त्यावर उभे राहतात . वस्तू खरेदी करणारे त्यांच्या गाड्याही तेथेच उभ्या करतात . त्यामुळे वाहतुकीस खोळंबा होतो .पालिका अतिक्रमण विभाग , वाहतूक विभाग , पोलिसांची कारवाई सुरू असली की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात . कारवाई आटोपली की , मग पुन्हा रस्त्यांवर येतात.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.