कीटकनाशक विक्रेत्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:35+5:302021-07-24T04:24:35+5:30
डॉ.पं.दे.कृ.वी. अंतर्गत कृषी संसोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. गीते यांच्या हस्ते आणि जि.प. चे कृषी विकास अधिकारी ...
डॉ.पं.दे.कृ.वी. अंतर्गत कृषी संसोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. गीते यांच्या हस्ते आणि जि.प. चे कृषी विकास अधिकारी व्ही. एस. बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली विदाता प्रशिक्षण केंद्र वाशिम या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास कृषी उपसंचालक नीलेश ठोंबरे, तर तज्ज्ञ मार्गदर्शक आर. एम. आंबेनगरे व एस. के. देशमुख मंचावर विराजमान होते. प्रस्ताविकात नोडल अधिकारी एस. के. देशमुख यांनी प्रशिक्षणाचे उद्देश व पुढील रूपरेषाची मांडणी केली. कृषी विकास अधिकारी व्ही. एस. बंडगर यांनी कीटकनाशक विक्रेत्यांनी पर्यावरणाचा समतोल व सामाजिक भान ठेवून ग्राहक हाच दैवत समजून शेतकऱ्यांना सेवा द्यावी व सेवा देताना शास्त्रीय दुष्टिकोण बाळगावा, असे आवाहन केले. डॉ. बी.डी.गीते यांनी योग्य प्रकारची कीटकनाशके व बुरशीनाशके कमी खर्चात कसे कीड नियंत्रण करू शकतील ते निसर्ग, जमीन व मनुष्यास हानिकारक नसतील अशा कीटकनाशके, बुरशीनाशके यांची निवड व वापर वाढविणे आपल्या अनुभवाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते पाहावे, असे सांगितले.
------------
फवारणीबाबत कृषी उपसंचालकांचे मार्गदर्शन
कृषी उपसंचालक नीलेश ठोंबरे यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत विवेचन करून कीटकनाशक विक्रेत्यांनी तांत्रिक प्रशिक्षणाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना सेवा द्यावी, असे सुचविले. या वेळेस त्यांनी कृषी विभाग अंतर्गत लागू असलेले शासकीय कायदे व तरतुदी तसेच शिक्षाबाबत जागरुक केले. प्रशिक्षणास निवडलेल्या बुलडाणा, वाशिम व जालना जिल्ह्यातील चाळीस कीटकनाशक औषध विक्रेत्यांची उपस्थिती लाभली.