बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून देणारी ‘चंद्रकला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:17 PM2018-06-12T15:17:21+5:302018-06-12T15:17:21+5:30

वाशिम : शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य, महिला संघटना व रोजगार निमिर्ती आदी क्षेत्रात उकळीपेन येथील चंद्रकला राहुल वाघमारे नामक महिलेने उत्कृष्ट कार्य करुन जिल्हयाच्या नावाचा लौकीक केला आहे.

'Chandrakala', which organizes the women in the savings group and provides employment to them. | बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून देणारी ‘चंद्रकला’

बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून देणारी ‘चंद्रकला’

Next
ठळक मुद्दे वाघमारे यांनी महिला व मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल सज्ञान करण्यासह महिलांना सक्षमीकरण्याचे कार्य स्विकारले असून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे.त्यांच्या कार्याची दखल  उन्नती ग्लोबल फोरमने घेवून त्यांच्या कार्याचा गौरव सुध्दा केला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे उकळीपेनसह जिल्हयाच्या बहूमानात भर पडली आहे.

- नंदकिशोर नारे । 
 
वाशिम : शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य, महिला संघटना व रोजगार निमिर्ती आदी क्षेत्रात उकळीपेन येथील चंद्रकला राहुल वाघमारे नामक महिलेने उत्कृष्ट कार्य करुन जिल्हयाच्या नावाचा लौकीक केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे महिलांना प्रेरणा मिळत आहे. 
चंद्रकला वाघमारे यांनी बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून दिला असून महिला बचत गट, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून गटाच्या सदस्यासह ग्रामस्थांना विकासाच्या प्रवाहात सामील केले आहे. वाघमारे यांनी महिला व मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल सज्ञान करण्यासह महिलांना सक्षमीकरण्याचे कार्य स्विकारले असून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे. आपल्या सामाजीक कार्याच्या माध्यमातून त्या गेल्या पाच वषार्पासून हे करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल  उन्नती ग्लोबल फोरमने घेवून त्यांच्या कार्याचा गौरव सुध्दा केला.  उन्नती ग्लोबल फोरमचा फेलोशिप पुरस्कार पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात  पद्भुषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, सिने अभिनेत्री मुणाल कुलकर्णी, सादिया सिध्दीका, अमोल गुप्ते आदींच्या हस्तप्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे उकळीपेनसह जिल्हयाच्या बहूमानात भर पडली आहे.
 
आपण महिलांसाठी करीत असलेल्या कार्यातून मिळत असलेले समाधान व नुकत्याच माझ्या कार्याच्या गौरवामुळे  अधिक बळ मिळाले आहे. यापुढे आपण जोमाने कार्य करुन बचत गटाच्या माध्यमातून उकळीपेन व परिसरातील महिला व शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करु 
- चंद्रकला राहुल वाघमारे

Web Title: 'Chandrakala', which organizes the women in the savings group and provides employment to them.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम