श्रावण सोहळ्यात सखी चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:07 AM2017-08-15T01:07:15+5:302017-08-15T01:09:24+5:30
वाशिम : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते लोकमत आणि सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावण सोहळ्याचे.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्थानिक स्वागत लॉन्स् येथे लोकमत सखी मंच तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी वाघ बकरी चहाकडून राकेश गुप्ता व कार्यक्रमाच्या परीक्षक सुरभी उखलकर, सीमा राठोड या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे वाघ बकरी चहा ब्रेव्हरेज पार्टनर असून, सखींनी वाघ बकरी चहाचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमात फॅशन शो दरम्यान सखींनी श्रावणातील नैसर्गिक दागिने परिधान करून कॅटवॉक करीत उपस्थितांची दाद मिळविली. तसेच मंगळागौरचे खेळदेखील मंचावर सादर करण्यात आले. तसेच उखाणा स्पध्रेत श्रावणावर आधारित उखाणे सादर केले त्याच प्रमाणे थाली सजावट स्पध्रेत महिलांनी अतिशय सुबक पद्धतीने थाली सजवून स्पध्रेला रंगत आणली. सखींनी स्पध्रेचा यथेच्छ आनंद घेत भरपूर बक्षिसे जिंकली.
विजेते स्पर्धक (अंतिम निकाल)
- पूजा थाली सजावट स्पर्धा : शोभा गायकवाड (प्रथम), दीपाली छापरवाल (द्वितीय)
- उखाणे स्पर्धा : प्रतिभा बोराळकर (प्रथम), ज्योती आगतकर (द्वितीय)
- फॅशन शो स्पर्धा : पायल छापरवाल (प्रथम), जया पुराणकर (द्वितीय)
- मंगळागौर स्पर्धा : श्रावणी सरी ग्रुप (प्रथम), श्रावण सखी ग्रुप (द्वितीय)