माकडांच्या लीलांनी वाशिम शहरातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:51+5:302021-05-29T04:29:51+5:30
वाशिम : शहरात माकडांनी मांडलेल्या उच्छादामुळे व त्यांच्या उपदव्यापामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून यांचा बंदाेबस्त लावण्याची मागणी जाेर ...
वाशिम : शहरात माकडांनी मांडलेल्या उच्छादामुळे व त्यांच्या उपदव्यापामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून यांचा बंदाेबस्त लावण्याची मागणी जाेर धरत आहे. चक्क घरात प्रवेश करीत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाशिम शहरातील काळे फैल, लाखाळा परिसर, आययूडीपी काॅलनी, मंत्रीपार्क यासह अनेक भागात माकडांचे कळप पाण्याच्या शाेधात येत आहेत. कूंपण भीतीच्यावरून आतमध्ये प्रवेश करून अनेक माकडे घरातील अन्न, भाजीपाला घेऊन जात आहे. नागरिक त्यांना हाकलण्यासाठी गेल्यास त्याच्या अंगावर धावत असल्याने अनेकवेळा आजूबाजूच्या नागरिकांना बाेलावून माकडांना घरातून काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही जणांच्या घरात लहान बालके असल्याने त्यांना सतत दरवाजे बंद करून घरात बसून रहावे लागत आहे. माकडांच्या लीलांनी शहरवासी त्रस्त झाले असून, वनविभागाने या माकडांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लाखाळा परिसरात गत आठ दिवसांपूर्वी घराच्या छतावर वाळविण्याकरिता ठेवण्यात आलेले धान्याची पूर्ण नासधूस केल्याची घटना घडली हाेती. तसेच काळे फैल परिसरात एका बालकावर माकडाने हलला चढविल्याने नागिरकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. सद्यस्थितीत चक्क माकडांचा कळप घरात प्रवेश करून नुकसान करीत असल्याचे चित्र आहे. संबंधितांनी लक्ष देऊन माकडांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.