कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा ही अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ३४ हजारांपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले. अनेकांचा संसर्गाने मृत्यूही झाला ; मात्र १ जूनपासून सातत्याने संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १० दिवसांत तर परिस्थिती अधिकच नियंत्रणात आली असून वाशिम शहरात केवळ १२ नवे रुग्ण आढळले आहेत.
.......................
पाच दिवस ठरले निरंक
वाशिम शहरात कोरोनासंबंधी चालू महिन्यातील आतापर्यंतच्या १० दिवसांचा आढावा घेतल्यास केवळ ५ जुलैला ८ बाधितांचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी एकच नवा रुग्ण निष्पन्न झाला आहे. तसेच १० दिवसांतील पाच दिवस एकही रुग्ण निष्पन्न झालेला नाही, असे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.