ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; १८ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:05 AM2021-03-12T11:05:08+5:302021-03-12T11:05:08+5:30
Crime News एका समाजातील दोन गटात तुफान हाणामारी ची घटना घडली. या घटनेत १८ जण जखमी झाले.
Next
श िरपूर जैन: नजीकच्या ढोरखेडा येथे जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका समाजातील दोन गटात तुफान हाणामारी ची घटना घडली. या घटनेत १८ जण जखमी झाले. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढोरखेडा येथे जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत राजू दौलत सावळे यांनी विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी पराभव केला. त्यामुळे या एका समाजातील दोन गटात वाद निर्माण होऊ लागले. या वादाचे रूपांतर ११ मार्च रोजी हाणामारीच्या घटनेचा झाले. या घटनेत दोन्ही गटातील सदस्य राजू दौलत सावळे, अनिल विठ्ठल सावळे, समाधान दौलत सावळे, दीपक बबन सावळे, ओंकार नथू हिवराळे, संपत पिराजी सावळे, बबन पिराजी सावळे, विठ्ठल संपत सावळे, सुनील नामदेव जाधव, उज्वला ओमकार हिवराळे, विजय नामदेव जाधव, शरद वामन सावळे, शशिकला विठ्ठल सावळे, सुनिता समाधान सावळे, जयश्री राजू सावळे, विद्या मनीष सावळे, दौलत गणपत सावळे व कौशल्याबाई दौलत सावळे हे १८ जण जखमी झाले. त्यापैकी १२ जणांना वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी १२ मार्च चार सकाळी नऊ वाजेपर्यंत फिर्याद दाखल न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.