अक्षयतृतीयानिमित्त वाशिम शहरातील पुतळ्यांची स्वच्छता आणि पूजन!                   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:49 PM2018-04-18T13:49:35+5:302018-04-18T13:49:35+5:30

वाशिम :  शहरात अक्षयतृतिया निमित्ताने आपल्या पुर्वजांचे स्मरण करण्याचा प्रघात आहे. हेच औचित्य साधून  ज्यांनी देशासाठी महान कार्य केले असे आपलेच पूर्वज अर्थात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ जावून त्याची स्वच्छता , अभिसिंचन आणि पूजन करण्यात आले.

Cleanliness and worship of statues of city of Washim | अक्षयतृतीयानिमित्त वाशिम शहरातील पुतळ्यांची स्वच्छता आणि पूजन!                   

अक्षयतृतीयानिमित्त वाशिम शहरातील पुतळ्यांची स्वच्छता आणि पूजन!                   

googlenewsNext
ठळक मुद्देसदर उपक्रमात शेकडोच्या संख्येत महिला पुरुष सहभागी झाले होते.  परिसरातील नागरिक शेकडोच्या संख्येने स्वागताला आधिच तयार होते. सदर उपक्रमाचा समारोप महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय पुतळ्याच्या पूजनाने झाला.

वाशिम :  शहरात अक्षयतृतिया निमित्ताने आपल्या पुर्वजांचे स्मरण करण्याचा प्रघात आहे .हेच औचित्य साधून  ज्यांनी देशासाठी महान कार्य केले असे आपलेच पूर्वज अर्थात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ जावून त्याची स्वच्छता , अभिसिंचन आणि पूजन करण्यात आले .या निमित्ताने पुतळा परिसरातील नागरिकात जागृती करून लोकजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या थोर पुरुषांचे थोडक्यात चरित्र लोकांसमोर या प्रसंगी मांडण्यात आले .                            

सदर उपक्रमात शेकडोच्या संख्येत महिला पुरुष सहभागी झाले होते.  मोटरसायकल ने सर्वजण शिस्तीत  प्रत्येक पुतळ्याजवळ गेले. त्याठिकाणचा परिसर आधिच त्या वस्तीतील लोकांनी स्वच्छ केला होता. परिसरातील नागरिक शेकडोच्या संख्येने स्वागताला आधिच तयार होते . प्रत्येक पुतळ्याच्या जवळ त्या त्या पद्धतीने थोर पुरुषांना वंदन करण्यात आले . गतवर्षी देखील  हा उपक्रम राबविला होता,  त्याला प्रचंड प्रतिसाद वाशिमकरांनी दिला होता . यावर्षी देखील सर्वांनी  या मुहूर्तावर पुर्वजांचे पूजन म्हणून पुतळा पूजनात प्रचंड संख्येत सहभाग नोंदविला होता .  ठीक ठिकाणी सहभागीना शरबत , चहापान , ताक मठ्ठा इत्यादिचे आयोजन वाशिमकरांनी केले होते .                     

सकाळी  आठ वाजता टिळक गार्डन येथे सर्वांनी टिळक पुतळयाचे पूजन करून सर्वजण स्व . राठीजी यांच्या पुतळयाचे पूजन करून  मोटरसायकल ने अकोला नाका येथे भगवान बुद्धाचे पूजन, त्यानंतर महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन तेथून महर्षि वाल्मीकी यांचे वाल्मीकी नगर रेलवे परिसर येथे पूजन , महाराणा प्रताप प्रतिमा पूजन ,स्वातंत्र्य सैनिक परलकर , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ,  महात्मा बसवेश्वर ,  ध्रुवपुतळा , विठ्ठल मंदिर परिसरातल्या संत रोहिदास  , संत गाडगेबाबा , सुभाष चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस ,  महात्मा फुले , जयस्तम्भांचे पूजन करण्यात आले . सदर उपक्रमाचा समारोप महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय पुतळ्याच्या पूजनाने झाला. समारोप प्रसंगी माजी आमदार अँड. विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी हा उपक्रम आवश्यक असून महापुरुषांच्या पूजनाने ऊर्जा प्राप्त होते म्हणून हा उपक्रम दरवर्षी घेण्याचा मनोदय व्यक्त केला .या कार्यक्रमास सर्व वाशिमकर महिला पुरुष , युवक युवतींनी सहभाग नोंदविला .न .प .च्या नगर सेवकांनी आपापल्या प्रभागात लोकजागर करून नागरिकांना उपस्थित ठेवले .  कार्यक्रमाच्या समारोपानंतर  अशोक हेडा यांचेतर्फे साबूदाणा खिचडी प्रसाद म्हणून देण्यात आला .

Web Title: Cleanliness and worship of statues of city of Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम