अडत व्यापा-यांचा कडकडीत बंद

By admin | Published: December 22, 2014 11:50 PM2014-12-22T23:50:38+5:302014-12-22T23:50:38+5:30

मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापा-यानी पुकारला बंद.

Clutter closure of obstruction traders | अडत व्यापा-यांचा कडकडीत बंद

अडत व्यापा-यांचा कडकडीत बंद

Next

मालेगाव (वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांकडून जी अडत घेतली जात होती ती बंद करण्याच्या पणन महामंडळाच्या निर्णयाविरोत मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापार्‍यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारला होता. पणन महामंडळाने उपरोक्त आदेश दिला होता की शेतकर्‍यांकडून अडत घेवू नये यावर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले त्यावर पणन मंत्री यांनी १५ दिवसासाठी स्थगीती दिली आहे. त्या निर्णयाविरोधात मालेगाव येथील अडत व्यापार्‍यांनीबंद पुकारला आहे. अडते जे अडत घेतात त्यामुळे शेतकर्‍यांना ताबडतोब पैसे दिले जातात. त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो मात्र हा निर्णय व्यापार्‍यांच्या विरोधात असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे त्या १ दिवसीय बंद मध्ये रवि भुतडा, योगेश मुंदडा, किशोर काबरा, योगेश जाजू, दिनेश अहिर, योगेश भुतडा, विजय अडीचवाल, सुमित मुंदडा, राजु बोरचाटे, शालीक बळी, शंकर मगर, आदी २१ व्यापार्‍यी व अडते यांनी सहभाग घेतला. व्यापारी शेतकर्‍यांकडून जी २ टक्के अडत घेतात त्यामुळे व्यापारी शेतकर्‍यांना नगदी पैसे मिळवून देतात. तसेच त्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी सहकार्य करतात. त्यामुळे हा निर्णय अन्याय कारक असल्याचे संचालक कृ.उ.बा.स. रवि भुतडा यांनी सांगीतले.

Web Title: Clutter closure of obstruction traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.