मंगरुळपीर: पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी सहभाग घेता आहे. या गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी येथील पंचायत समिती सभागृहात २७ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता पाणी फाऊंडेशनच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, या स्पर्धेसाठी २५ गावांतील प्रत्येकी ५ लोकांनी प्रशिक्षणही घेतले आहे. आता या गावांतील लोकांना जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासह पाणी फाऊंडेशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगरुळपीर येथील पंचायत समितीत २७ मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्धिवेदी राहणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक,तहसीलदार वैशाख वाहुरवाघ,पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समनव्यक संतोष गवळे व मंदार देशपांडे, गटविकास अधिकारी एन. टी. खैरे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, वनअधिकारी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वॉटर कप स्पर्धा ३ याविषयी मान्यवराकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच स्पर्धेचे स्वरुप व जलउपचाराबाबत विस्तृत चर्चा करण्यात आहे.