व्यापाऱ्यांच्या काेराेना चाचणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:40+5:302021-03-16T04:41:40+5:30
मानोरा : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे विभागीय आयुक्तांचे निर्देशानुसार मानोरा शहरात १५ मार्चपासून काेराेना चाचणी सुरु ...
मानोरा : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे विभागीय आयुक्तांचे निर्देशानुसार मानोरा शहरात १५ मार्चपासून काेराेना चाचणी सुरु करण्यात आली आहे. ही चाचणी १९ मार्चपर्यंत विविध भागात केली जाणार आहे. व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, कामगार यांनी आपली चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शारदा जाधव यांनी केले. १५ मार्च राेजी दिग्रस चौक परिसर ते पोलीस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी करण्यात आलाी. १६ मार्च रोजी सकाळी दिग्रस चौक परिसर ते बीएसएनएल ऑफिस परिसर,१७ मार्च रोजी तहसील कार्यालय ते दिग्रस चोैक परिसर, १८ मार्च राेजी दिग्रस चौक ते बसस्थानक, मार्केट परिसर, १९ मार्च रोजी दिग्रस चौक परिसर, मंगरुळपीर सोमठाना रोड येथील संबधित सर्व कार्यालये या भागातील व्यापारी, दुकानदार यांची चाचणी करण्यात येणार आहे.