कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कारंजाचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे १ मार्च रोजी सायंकाळी आपले कर्तव्य बजावत असताना एका पेट्रोल पंपाजवळ रसवंती व एक हॉटेल व्यवसायिक हे दुकाने बंद करण्याची वेळ सायंकाळी ५ असतानासुद्धा सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रकिया मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, लिपिक राहुल सावंत व चमू करीत होते. संबंधित दुकानदारांकडून दंडाची रक्कम वसूल करीत असताना, तेथे नगराध्यक्ष शेषराव ढोके हे सात ते आठ जणांसह हजर झाले. संबधित दुकानदाराविरूध्द कारवाई करण्यास मनाई केली व सुधिर चकोर यांचे हातातील पावती पुस्तक हिसकावून घेतले तसेच बाचाबाची केली. शिविगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली. शासकीय काम करीत असताना अडथळा निर्माण करणाºया नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्या विरूध्द कार्यवाही करावी असे तक्रारीत नमूद आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा वाद आता विकोपाला गेल्यामुळे शहरा उलटसुलट चर्चा सुरू आहे. हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते, याकडे सवार्चे लक्ष लागले आहे.
कारंजा नगराध्यक्षाविरूद्ध मुख्याधिकाºयांची तक्रार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:18 AM