^^^^
आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर गुरुवारी गर्भवती व स्तनदा मातांसह ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
-------
विद्युत पथदिवे दुरूस्तीची मागणी
वाशिम : पावसाळा सुरू झाला असून, रात्रीच्यासुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील खेडेगावातील काही ठिकाणचे नादुरूस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
------------
ग्रामपंचायत इमारती शिकस्त, अपघाताची भीती
वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. याच शिकस्त इमारतीतून ग्रामपंचायतींचा कारभार चालवावा लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात यामुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
---
तोंडगाव परिसरात जोरदार पाऊस
वाशिम : परिसरात गत चार दिवसांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला असून, ढगाळ वातावरण कायम असल्याने काही शेतकरी मात्र सावधगिरी बाळगत असल्याचे दिसत आहे.