जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक व आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या सायकल यात्रेतून कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत असून, गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. भाववाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार अमित झनक, अॅड. दिलीपराव सरनाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाशिम शहरातून सायकल यात्रा काढली. यावेळी जिल्हा निरीक्षक प्रकाश साबळे, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, किसनराव मस्के, राजू चौधरी, राजू वानखेडे, शंकर वानखेडे, महादेव सोळंके, विशाल सोमटकर, पी.पी. अंभोरे, राजू घोडीवाले, योगीराज गायकवाड, परशराम भोयर, मधुकरराव जुमडे, गजानन गोटे, आरीफभाई आदी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
०००००
कॉंग्रेस, युपीएच्या काळात पेट्रोल ६२ रुपये लिटर !
कॉंग्रेस, युपीएच्या काळात पेट्रोल प्रती लिटर ६२ रुपये, गॅस ४०० रुपयांना मिळत होता. सात वर्षात गॅसचे भाव दुपटीने वाढले तर पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ४५ रुपयाने वाढ झाली. भाववाढ करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या.