Corona Cases : आणखी दोघांचा मृत्यू ; २७९ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 12:01 PM2021-04-11T12:01:57+5:302021-04-11T12:02:08+5:30
CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू तर २७९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १० एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असून, आणखी दोघांचा मृत्यू तर २७९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १० एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. दरम्यान शनिवारी २०८ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १८,८७९ वर पोहोचला आहे.
शनिवारी प्राप्त अहवालानुसार उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर २७९ जणांना कोरोना संसर्ग झाला, वाशिम शहरातील इंगोले नगर येथील १, नवीन आययुडीपी येथील २, लोनसुणे ले-आऊट येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, पाटणी चौक येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील १, टिळक चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ८, लाखाळा येथील २, मंत्री पार्क येथील २, भगवती येथील ३, काळे फाईल येथील २, कास्टे हॉटेल परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ६, प्रशासकीय इमारत येथील १०, योजना पार्क येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ३, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ११, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ४, जिल्हा परिषद परिसरातील ८, पशुसंवर्ध विभाग परिसरातील १, यांत्रिकी विभाग येथील १, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग परिसरातील ३, गणेश नगर येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील १, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील १, मन्नासिंग चौक परिसरातील १, ध्रुव चौक येथील १, गोपाल टॉकीज परिसरातील १, गणेश पेठ येथील १, रेल्वे वसाहत येथील १, कुंभार गल्ली येथील १, शिव चौक येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २२, बाभूळगाव येथील १, श्रीगिरी येथील २, कानडी येथील १, सावरगाव बर्डे येथील २, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण नावजी येथील १, फाळेगाव येथील १, बिटोडा येथील २, तोंडगाव येथील ४, उमराळा येथील ३, ब्राह्मणवाडा येथील १, झाकलवाडी येथील १, गोडेगाव येथील २, सुपखेला येथील ४, पांडव उमरा येथील २, पार्डी टकमोर येथील १, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील २, वाई येथील २, वारा जहांगीर येथील १, कोयाली बु. येथील १, खारोळा येथील १, सुराळा येथील १, जांभरुण येथील १, रिसोड शहरातील गैबीपुरा येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मांगूळ झनक येथील १, वनोजा येथील १, रिठद येथील १, गोवर्धन येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. ८ मधील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पंचायत समिती परिसरातील २, तहसील परिसरातील १, इतर ठिकाणचे ११, किन्हीराजा येथील ३, बोराळा येथील ३, शेलगाव येथील १७, शिरपूर येथील ४, झोडगा येथील १, अमानवाडी येथील १, करंजी येथील २, वसारी येथील १, नंधाना येथील १, मंगरूळपीर शहरातील बायपास परिसरातील १, कल्याणी चौक येथील ४, शहरातील इतर ठिकाणचा १, वरुड येथील १, शहापूर येथील १, शिवणी रोड येथील १, नांदगाव येथील १, शेलूबाजार येथील १, पार्डी ताड येथील १, तऱ्हाळा येथील १, मानोरा शहरातील संभाजी नगर येथील १, पंचायत समिती परिसरातील १, गोकुळ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, उमरी येथील ३, वसंतनगर येथील १, देवठाणा येथील १, कोंडोली येथील १, गिरोली येथील १, गोंडेगाव येथील १, धामणी येथील १, रुई येथील १२, सोयजना येथील १, हातना येथील १, कारंजा शहरातील कोहिनूर नगर येथील १, वाल्मिकी नगर येथील १, दाईपुरा येथील १, कृष्णा कॉलनी येथील २, पंचशील नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, वाई येथील १, काली येथील १, बांबर्डा येथील १, धोत्रा जहांगीर येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, बेलखेडा येथील १, कामरगाव येथील ३, पिंप्री मोडक येथील १, मसला येथील १, खेर्डा येथील २, काजळेश्वर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.