वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून रविवार, ११ जुलै रोजी १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर २२ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,५६९ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी नव्याने १३ रुग्ण आढळून आले तर २२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, कारंजा व मानोरा तालु्क्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१५६९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०८२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील दोन बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले. ११७ सक्रिय रुग्णरविवारच्या अहवालानुसार नव्याने १३ रुग्ण आढळून आले तर २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ११७ रुग्ण सक्रिय आहेत.
Corona Cases in Washim : १३ पॉझिटिव्ह;२२ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 7:12 PM