Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:36 PM2021-06-14T17:36:12+5:302021-06-14T17:36:22+5:30

Corona Cases in Washim: सोमवार, १४ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim: Death of another; 44 corona positive | Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून सोमवार, १४ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१०७३ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याच चित्र आहे.सोमवारी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने ४४ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली आहे. मंगरूळपीर व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१०७३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३९८७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६०१ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
 
५९९ सक्रिय रुग्ण
सोमवारच्या अहवालानुसार नव्याने ४४ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५९९ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: Corona Cases in Washim: Death of another; 44 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.