लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, ११ मे रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४६७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३३०१३ वर पोहोचला आहे.मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे मंगरुळपीर तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. एकूण ४६७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम ७२, मालेगाव तालुक्यातील ६८, रिसोड तालुक्यातील ५७, मंगरूळपीर तालुक्यातील १०७, कारंजा तालुक्यातील ८४ आणि मानोरा तालुक्यात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २९ बाधिताची नोंद झाली असून ६८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम तालुक्यातील रुग्णसंख्येत घट मंगळवारी प्राप्त अहवालानुसार गत आठ दिवसात पहिल्यांदाच वाशिम तालुक्यातील रुग्णसंख्येत घट आल्याचे दिसून आले. वाशिम तालुक्यात ७२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारच्या अहवालानुसार समोर आले. त्या तुलनेत मंगरुळपीर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
६८० जणांची कोरोनावर मातमंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ४६८ रुग्ण आढळून आले तर तब्बल ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरणारी आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल व खासगी कोविड हॉस्पिटल येथे जवळपास ९५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरीत जवळपास ३४०० रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.