वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असताना, मृत्यूसत्र कायम राहत असल्याचे दिसून येते. रविवार, १३ जून रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१०२९ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याच चित्र आहे. रविवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने ३३ रुग्ण आढळून आले तर ८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली आहे. मालेगाव व कारंजा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१०२९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३९७८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६४२ जणांचे मृत्यू झाले. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले. ६४२ सक्रिय रुग्णरविवारच्या अहवालानुसार नव्याने ३३ रुग्ण आढळून आले तर ८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ६४२ रुग्ण सक्रिय आहेत.