मेडशी येथे एक कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:58+5:302021-04-28T04:44:58+5:30

०० कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन वाशीम : कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित असून कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता ...

A corona patient at Medashi | मेडशी येथे एक कोरोना रुग्ण

मेडशी येथे एक कोरोना रुग्ण

Next

००

कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन

वाशीम : कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित असून कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने मंगळवारी केले.

०००००

जांभरुण येथे सात बाधित

वाशीम : वाशीम तालुक्यातील जांभरुण नावजी येथे आणखी सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

ट्रिपलसीट वाहतुकीकडे दुर्लक्ष

वाशीम : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून किन्हीराजाची ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील बाजारपेठ बंद आहे. मात्र वाहने सुरूच असून दुचाकी वाहनावर ट्रिपलसीट वाहतुकीचा प्रकारही घडत आहे.

०००००

कोरोनाविषयक जनजागृती

वाशीम : शिरपूर परिसरात मंगळवारी दुबळवेल येथील १, दुधाळा येथील १, एकांबा येथील २ असे रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने मंगळवारी जनजागृती केली.

०००००

गावठाण सीमेचा प्रश्न निकाली निघणार

वाशीम : स्वामित्व योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावठाणच्या सीमा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघणार असल्याचे सांगितले जात आहे.

०००००

बाधितांच्या संपर्कातील संदिग्धांची चाचणी

वाशीम : केनवड परिसरात मंगळवारी पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. बाधितांच्या संपर्कातील जवळपास १० जणांची तपासणी केली असून, कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

००००

विनामास्क प्रवाशांवर कारवाई

वाशीम : मानोरा, कारंजा शहरात वाहनांची तपासणी केली जात असून, गत दोन दिवसात विनामास्क प्रवास करणाऱ्या जवळपास ५४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

००००

रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी

वाशीम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मेडशी, जऊळका रेल्वे परिसरात असलेल्या विद्युत कृषी रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. फळबागांचे यामुळे नुकसान होत असून, महावितरणने रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

०००

अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करा

वाशीम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल नसल्याने अडचणी उद्भवल्या आहेत. हे प्रस्ताव नियमानुकूल करावे, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी सोमवारी केली.

०००००

मालेगाव तालुक्यात चाराटंचाई

वाशीम : जनावरांच्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका आदी प्रकारच्या हिरव्या चारा पिकांची लागवड मालेगाव तालुक्यात नगण्य स्वरूपात झाली. त्यामुळे आता चाराटंचाई जाणवत असल्याचे दिसून येते.

००

महाऊर्जा अभियानाची जनजागृती

वाशीम : महाऊर्जा अभियानाची जनजागृती केली जात आहे. मात्र, कोरोनामुळे व्यत्यय निर्माण होत आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले.

000

रस्त्यावर खड्डे, वाहनधारक त्रस्त

वाशीम : तालुक्यातील जुमडा, टोऱ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

००

Web Title: A corona patient at Medashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.