कोरोना संपला आता लस कशाला; नागरिकांची लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:11+5:302021-09-18T04:44:11+5:30
००००००००००००००००० लसीकरण केंद्रही पडले ओस जिल्ह्यात एकूण १३५ लसीकरण केंद्र सुरू असून. कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे ...
०००००००००००००००००
लसीकरण केंद्रही पडले ओस
जिल्ह्यात एकूण १३५ लसीकरण केंद्र सुरू असून. कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ केली आहे. तासा दोन तासांत केवळ दोन-चार व्यक्ती लस घेण्यासाठी केंद्रावर येत असल्याने दिवसभर लसीकरण केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे. जिल्हाभरात हे चित्र पाहायला मिळते.
०००००००००००००००००००
लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढणार
लसीकरण केंद्रावर तासा दोन तासांत तीन ते चारच व्यक्ती येतात. प्रत्यक्षात लसीचे व्हायल वापरात घेण्यासाठी लस घेणारे किमान दहा व्यक्ती आवश्यक आहेत. लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांना त्यासाठीच थांबवून ठेवले जाते; परंतु संख्या वाढत नसल्याने लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
०००००००००००००
लस न घेणे ठरणार घातक
कोरोनाच्या कहरापासून सुरक्षिततेसाठी लस हाच रामबाण उपाय असून, लस घेणाऱ्यापेक्षा लस न घेणाऱ्यांना मृत्यूचा धोका ११ पट अधिक असल्याचे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या अमेरिकेतील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस टोचून घेणे आवश्यक आहे.
०००००००००००००
कोट: गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाचे प्रमाण घटले आहे. अद्यापही जिल्ह्यात ५ लाख ८२ हजार १३० लोकांनी पहिलाही डोस घेतला नाही. ही बाब निश्चितच गंभीर आहे. आरोग्य विभाग आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असून, नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष न करता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक
०००००००००००००००००००
लसीकरणाची १६ सप्टेंंबरची स्थिती
उद्दिष्ट -१०,१३,१८०,
पहिला डोस - ४,३१,०५०,
दुसरा डोस- १,९०,७३१,
--------------
०३ सप्टेंबरची स्थिती
उद्दिष्ट -१०,१३,१८०,
पहिला डोस - ४,११,१९०,
दुसरा डोस- १,६६,५२७