‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 04:03 PM2020-05-18T16:03:19+5:302020-05-18T16:03:27+5:30

शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे.

Corona sank the business of soft drink vendors | ‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला

‘कोरोना’मुळे शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.
उन्हाची तीव्रता वाढली की, सर्वच नागरिक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी उसाचा रस लस्सी, मठ्ठा, कुल्फी, आइस्क्रीम यासह शितपेयाकडे धाव घेतात. पण यावर्षी राज्याला कोरोनाची पृष्ठभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे गत चार-पाच महिन्यांपासून शितपेय व्यवसायिकांनी केलेले नियोजन कोमलडल्याने सदर व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न पुढे आला आहे.  एप्रिल व मे हे दोन महिने अधिक व्यवसाय देणारे असतात. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असल्याने अनेक जण या व्यवसायात उतरतात. पण लॉकडाउन सुरू झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या मे महिना अर्धा संपला असून काही दिवसातच पावसाचे आगमन होणार आहे.त्यामुळे शीतपेय विक्रीचा मुख्य व्यवसाय बुडाल्याने व्यावसियीकांना फटका बसला.
 
अनेकांनी व्यवसायात केला बदल
शितपेय विक्रेत्यांना यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमिवर व्यवसाय करता आला नसल्याने अनेकांनी भाजीविक्री, फळ व्यवसायायासह दुसºया व्यवसायाला पसंती दिल्याचे दिसून आले.

Web Title: Corona sank the business of soft drink vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.