कोरोनामुळे प्रशिक्षण कार्य थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:53+5:302021-02-27T04:55:53+5:30

............... देयके थकविणाºयांवर वीज कपातीची कारवाई जऊळका रेल्वे : विद्युत देयके थकविणाºयांवर महावितरणकडून वीज कपातीची धडक कारवाई करण्यात येत ...

Corona stopped training | कोरोनामुळे प्रशिक्षण कार्य थांबले

कोरोनामुळे प्रशिक्षण कार्य थांबले

Next

...............

देयके थकविणाºयांवर वीज कपातीची कारवाई

जऊळका रेल्वे : विद्युत देयके थकविणाºयांवर महावितरणकडून वीज कपातीची धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत परिसरात शंभरावर कारवाया करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून प्राप्त झाली.

................

मुख्य मार्गावर वाहनांची कसून तपासणी

वाशिम : शहरातून पुसदकडे जाणाºया व शहरात येणाºया सर्व वाहनांची निर्माणाधिन उड्डाणपुलानजिक कसून तपासणी केली जात आहे. शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात असून विना मास्क प्रवास करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

..............

शेतशिवारातील ऑटो स्विच हटविले

मेडशी : कृषीपंपांना विज पुरवठा होणाºया इलेक्ट्रीक स्टार्टरमधील डब्यात ऑटो स्विच बसवून ठराविक अंतरावरून मोटारपंप बंद, चालू करण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून महावितरणने काही ग्राहकांकडील ऑटो स्विच हटविण्याची कारवाई गुरूवारी केली.

...................

विलंबाने पेरलेल्या हरभऱ्याची काढणी

किन्हीराजा : यावर्षी शेतांमध्ये तुलनेने मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याआधारे काही शेतकºयांनी विलंबानेही हरभरा पिकाची पेरणी केली होती. हे पीक सध्या काढून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

.............

बँकांमध्ये नियमांचे पालन करण्याचा विसर

वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह सॅनिटायझरची व्यवस्थाही नसल्याचे शुक्रवारी पाहणीदरम्यान आढळून आले.

............

कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन

वाशिम : नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता शासनाने घालून दिलेले कोरोनाविषयक नियम पाळावे. पोलिसांवर ताण येईल, अशी कृती करू नये, असे आवाहन ठाणेदार धृवास बावनकर यांनी केले आहे.

...............

ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्न प्रलंबित

वाशिम : स्थानिक नगर परिषदेकडून दैनंदिन शहरात घंटागाडी फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला जातो; मात्र ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून न.प.ने लक्ष देण्याची मागणी आकाश चव्हाण यांनी शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.

..............

ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ

वाशिम : कोरोनामुळे शाळा बंद झाल्या असून सायंकाळी ५ वाजतानंतर दुकानेही बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. यामुळे मात्र प्रवासीच मिळत नसल्याने ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

Web Title: Corona stopped training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.