मालेगावात १३०० व्यापाºयांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:31+5:302021-03-04T05:18:31+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांना कोरोनाचा विळखा बसलेला आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांना कोरोनाचा विळखा बसलेला आहे. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्याचे अहवाल वेळेत मिळाल्यास पुढील उपाययोजना करणे शक्य होणार आहे. असे असताना शहरातील १३०० व्यापाºयांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे अहवाल गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रलंबित आहेत. हे व्यापारी दिवसभर दुकाने उघडून व्यवसाय करित आहेत. त्यांचा दैनंदिन शेकडो लोकांशी संपर्क येत आहे. असे असताना त्यांच्यापैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास एकाचवेळी अनेकजण बाधीत होण्याची भिती निर्माण झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. आरोग्य विभागाने ही बाब लक्षात घेऊन व्यापाºयांचे कोरोना चाचणी अहवाल विनाविलंब द्यावे आणि पुढील उपाययोजना करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.