CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 06:33 PM2020-06-16T18:33:21+5:302020-06-16T18:35:37+5:30
अहलावानुसार जिल्ह्यातील १३ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, सोमवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालासह मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील १३ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात कारंजा लाड येथील ९, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील एक, मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील दोन आणि शेलुबाजार येथील एका महिलेचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६७ झाली असून, त्यापैकी ५५ जण उपचाराखाली आहेत.
सोमवारी रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामध्ये कारंजा लाड येथील ३८ व ४८ वर्षीय महिला, ३३ व ५८ वर्षीय पुरूष व दोन ६ वर्षीय मुली अशा एकूण ६ व्यक्तींचा समावेश होता. हे सर्वजण कारंजा येथील गांधी चौक येथील कोरोना बाधितांच्यानजिकच्या संपर्कातील आहेत. त्याशिवाय हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील २९ वर्षीय युवकही कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर युवक विरार, मुंबई येथून आला असून, तेथे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. मंगळवारी सकाळी शेलुबाजार येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती कोरोनाबाधित वृद्धाची मुलगी आहे, तसेच मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे कल्याण, मुंबई येथून परतलेल्या कुटुंबातील चौघांपैकी पुरुष आणि मुलगा मिळून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर सायंकाळी प्राप्त अहवालानुसार कारंजा येथील माळीपुरा, कारंजा लाड येथील ३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये दोन ३६ वर्षीय पुरुष व एका २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हे सर्वजण कारंजा शहरातील कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहेत.
नागरिकांच्या तपासणीसाठी जिल्ह्यात ८० पथके
जिल्ह्यात ज्या व्यक्तीचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्या व्यक्तींच्या हायरिस्क संपर्कातील लोकांना आयसोलेनशन कक्षात दाखल करून त्जयांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेतच. शिवाय कोरोनाबाधितांचे संबंधित गाव कन्टेनमेंट झोन जाहीर करून त्यागावातील सर्व नागरिकांची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत. सद्यस्थितीत अशा गावांत आरोग्य विभागाच्या प्रत्येकी दोन व्यक्तींचा समावेश असलेली ८० पथके विविध ठिकाणी नागरिकांची तपासणी करीत आहेत.