CoronaVirus : जळगाव जामोदमधील मृत व्यक्तीच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील १६ जण क्वारंटीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:37 PM2020-05-19T17:37:23+5:302020-05-19T18:13:26+5:30
मृत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व जवळचे नातेवाईक अशा एकूण १६ जणांना क्वारंटीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: शहरातील ७२ वर्षी वर्षीय संदिग्ध रुग्णाचा खामगाव येथील कोविड रुग्णालयात १६ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर १८ मे रोजी सायंकाळी या संदिग्ध मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जळगाव जामोद शहरता खळबळ उडाली होती. दरम्यान या मृत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व जवळचे नातेवाईक अशा एकूण १६ जणांना आरोग्य विभागाने क्वारंटीन करण्यात आले असून त्यांना बुलढाणा येथे कोविड रुग्णालयात सोमवारी हलविण्यात आले आहे.
या मृत व्यक्तीला प्रारंभी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची तपासणी करण्यात आली होती कोरोना संदिग्ध रुग्ण वाटल्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीस नंतर खामगाव येथे हलविण्यात आले होते. त्यामुळे जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व संबंधित कर्मचारी यांचा रुग्णाशी संपर्क आला होता. परिणामी तपासणी करणारे डॉक्टर व त्याची पत्नी, परिचारिका आणि तिच्या संपर्कातील व्यक्ती, सफाई कमर्चारी अशा सहा जणांना सुरक्षेच्या दृष्टीने क्वारंटीन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी त्यांना बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना क्वारंटीन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सुलतानपूरा व परिसर कंटेनमेंट झोन.
सुलतानपुरा व त्याच्या सभोवतालचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटी्ह आले तर हे प्रतिबंधीत क्षेत्र शिथील करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार सुनील जाधव यांनी दिली. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता जळगावकरांना चांगलीच धास्ती बसली आहे.