Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:29 PM2020-05-14T17:29:46+5:302020-05-14T17:30:19+5:30

Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.

Coronavirus: Everyone exposed to coronavirus is negative | Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह

Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल १० मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर, ‘हाय-रिस्क’ संपर्कात आलेल्या कारंजा येथील एका खासगी डॉक्टरसह पाच तसेच पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण ७ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने १३ मे रोजी निगेटीव्ह आले होते. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सात आणि अन्य दोन असे ९ जणांचे अहवालही १४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता निगेटिव्ह आल्याने  जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला.
मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका मधुमेही रूग्णाला अस्वस्थ वाटल्याने त्याला कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात चार दिवस भरती केले होते. रुग्ण कारंजा येथून अकोला आणि अकोला येथून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ८ मे रोजी उपचारार्थ दाखल झाला. १० मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने, त्याच्यावर उपचार करणाºया कारंजा येथील त्या खासगी डॉक्टरसह पाच जण तसेच पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण सात नमुनेही तपासणीसाठी पाठविले होते. या ११ नमुन्यांचे अहवाल १३ मे रोजी निगेटिव्ह आले.१२ मे रोजी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सात जण आणि अन्य ठिकाणचे दोन जण असे एकूण ९ जणांच्या थ्रोट स्वॅबचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नऊ जणांचे अहवाल १४ मे रोजी प्राप्त झाले असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला.
आतापर्यंत ९७ जणांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ९४ अहवाल निगेटिव्ह तर तीन अहवाल पॉझिटिव्ह आहेत. या तीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्ण बरा झाल्याने त्याला २४ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर कोरोनाबाधित ट्रक क्लिनरचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधित असलेल्या ट्रक चालकावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 
दरम्यान, कवठळ येथील नागरिकांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Coronavirus: Everyone exposed to coronavirus is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.