CoronaVirus in Washim : ४९१ गावांचे होणार निर्जंतुकीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:45 AM2020-04-07T10:45:07+5:302020-04-07T10:45:21+5:30
पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड ४९१ ग्रामपंचायतींना पुरविले जाईल.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये निर्जंतुकीरणासाठी आवश्यक असलेले पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड हे जंतूनाशक पहिल्या टप्प्यात पुरविले असून, सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण झाले. आता दुसऱ्या टप्प्यात येत्या आठवड्यात आणखी पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड ४९१ ग्रामपंचायतींना पुरविले जाईल. याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १४ व्या वित्त आयोगाचा राखीव निधी खर्च करण्यासही मुभा दिली आहे.
ग्रामीण भागात साथरोगाचा फैलाव होऊ नये याकरीता सोडीयम हायपोक्लोराईड हे जंतूनाशक फवारले जाते. या जंतूनाशकाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग दोन टप्प्यात १० हजार लिटर जंतूनाशक पुरविणार आहे. पहिल्या टप्प्यातील जंतूनाशक यापूर्वीच पुरविण्यात आले. दुसºया टप्प्यातील जंतूनाशक उपलब्ध केले असून, संबंधित ग्रामपंचायतींना तीन दिवसांत पुरविले जाणार आहे.
निर्जंतुकीकरण न केल्यास कारवाई
ग्रामीण भागात साथरोग निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशकाची व्यवस्था केली आहे. आता दुसºया टप्प्यात पाच हजार लिटर जंतूनाशक पुरविले जाईल.
- चक्रधर गोटे
आरोग्य सभापती, जि.प. वाशिम