CoronaVirus in Washim : 'हाेम आयसाेलेशन'मध्ये ६७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 01:04 PM2020-10-28T13:04:59+5:302020-10-28T13:05:08+5:30
Washim corona News सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या व घरी सुविधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या; परंतू, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यात गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या गृह विलगीकरणात ६७ रुग्ण आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण हा मेडशी (ता.मालेगाव) येथे आढळला होता. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतल्याने जुलै ते सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या व घरी सुविधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या गृह विलगीकरणात ६७ रुग्ण असून यामध्ये रिसोड व मानोरा तालुक्यातील एकही रुग्ण नाही. प्रशासनाची गृहविलगीकरणासाठी काय व्यवस्था ? गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी संबंधित रुग्णाचा आढावा घेतात. काही त्रास जाणवल्यास त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले जाते. कोरोना पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या व घरी सुविधा असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
सध्या जिल्ह्यात ६७ रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचा वाॅच आहे.
- एस. षण्मुगराजन, जिल्हाधिकारी