अवैध गौण खनिजप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:10+5:302021-01-25T04:41:10+5:30
२३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान विनोद बारबोले यांच्या मालकीचा एम.एच.३७ एफ ७९१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैध मार्गाने मुरमाची ...
२३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान विनोद बारबोले यांच्या मालकीचा एम.एच.३७ एफ ७९१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैध मार्गाने मुरमाची वाहतूक होत असल्याचे यशोदा पार्ट २ काॅलनी येथे आढळून आले. या प्रकरणी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धीरज मांजरे यांनी चैाकशी करून मंडळ अधिकारी पी.एस.अंधारे व तलाठी एस.एस.सावरकर यांना ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्याच्या सूचना दिल्या. वेदांत शाळेजवळ मूर्तिजापूर रोडने ट्रॅक्टर उभे केले असता, ट्रॅक्टर चालकाने व बिलाल पुजांनी रा.कारंजा या दोघांनी बळजबळीने ट्रॅक्टर पळवून नेले. त्यानंतर, तहसीलदार धीरज मांजरे कारंजा-मानोरा रोडवर परत येताना, त्यांना वाटेत अडवून ट्रॅक्टर कसा पकडता, असे म्हणून धमकी दिली. या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध भारतीय दंडसंहिता १८६० नुसार ३४१, १८८, १८६, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.
००००
शासनाच्या गौण खनिजाची अवैधरीत्या चोरी होत असल्यास, त्यांच्यावर कडक नजर ठेवून कारवाई करण्यात येईल. शासनाच्या नियमाप्रमाणे राॅयल्टी भरूनच गौण खनिजाचा उपयोग व्हावा. त्यामुळे तालुक्यात कोणीही अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करून नये, असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले.