स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:36+5:302021-03-16T04:41:36+5:30
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, वाशिमचे समन्वयक अनिल ...
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, वाशिमचे समन्वयक अनिल ठोंबरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्राम मुंगळाचे उपसरपंच नंदकिशोर वनस्कर, सागर वाकळे, संगीता काळबांडे, शंकर मोहोकार, वैशाली खोब्रागडे-मेश्राम, भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, वाशिम संचालक विवेक सावंत, यश कंकाळ यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना लोकांना एकमेकांशी जोडणे आणि स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जनतेला माहिती देणे, हा अमृत महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी युवा कलावंत ढोलकीवादक तथा शाहीर अलोकरत्न भगत, प्रताप वानखडे (महिला पात्र) यांच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून लोकसहभागाचा संदेश देण्यात आला. त्यांना शाहीर निरंजन भगत, गायिका विद्याताई भगत यांची साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा भगत यांनी केले. वर्षा वाघ हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागसेन पट्टेबहादूर, गजानन नवघरे, गोकुळ महाले, समाधान करडीले, नितीन आढाव, अशांत कोकाटे, नीलेश खोरणे, विकास पट्टेबहादूर, महादेव क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.