या मोहिमेमध्ये सहभागी ९ युवक सुपर रांदीनियर पदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत वाशीम येेथून सुनील मुंदे, युसूफ शेख, विशाल ठाकूर, राजेश जाधव, चेतन शर्मा, नागपूर येथून डॉ. अजय कुलकर्णी, डॉ. अतुल कुलकर्णी, आर्णी येथून प्रमोद बुटले, वसमत येथून डॉ. राजकुमार भारुका, नीलेश सोनी, विवेक शिंदे, औरंगाबाद येथून शरद गोयल, अमरावती येथून देव भोजे, चारुल पालकर, गणेश बोरोकार, विजय धुर्वे, निशांत गुप्ता, ऋषिकेश इंगोले, बाबाराव मेश्राम, विनोद वानखेडे यांनी सहभाग घेतला होता. स्थानिक पाटणी चौक येथून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नीरज चारोळे, कुणाल पत्की, पवन शर्मा आदींनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर वाशीम, मंगरुळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, पांढुरणा (मध्यप्रदेश) सावनेर व परत वाशीम असे ४० तासांचे निर्धारित अंतर २० पैकी १४ सायकलपटूंनी यशस्वीरित्या पार पाडत मोहीम यशस्वी केली. मोहीम समाप्तीनंतर आदेश कहाते, दीपक एकाडे, नगरसेवक राहुल तूपसांडे, नंदकिशोर पाटील, डॉ. भरत सातपुते, सुधीर भोयर, सुरेश शिंदे, प्रशांत बक्षी, नारायण ढोबळे, सागर रावले, कुणाल पत्की, पवन शर्मा आदींसह नागरिकांनी या सायकलस्वारांचे जोरदार स्वागत केले.
सायकलस्वारांची ६०० किलोमीटरची सायकल मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:44 AM