अतिपावसाने शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:30+5:302021-07-29T04:41:30+5:30
०००००० ‘फीव्हर क्लिनिक’मधील गर्दी ओसरली! वाशिम : चालू महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटल्याने वाशिम शहरासह तालुकावासीयांना दिलासा मिळत ...
००००००
‘फीव्हर क्लिनिक’मधील गर्दी ओसरली!
वाशिम : चालू महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटल्याने वाशिम शहरासह तालुकावासीयांना दिलासा मिळत असून, फीव्हर क्लिनिकमधील गर्दीही ओसरली आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली होती.
०००००
छोट्या मालवाहू वाहनांतून जडवाहतूक
वाशिम : छोट्या मालवाहू वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात लोखंडी गज बांधून वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
००००००
कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी बुधवारी केले.
००००००
शेतात ६९ ‘रिचार्ज पीट’ तयार
वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार केले आहेत.