शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

कृषी विज्ञान केंद्राद्वारे अद्ययावत हळद लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:29 AM

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पिकांचा फेरपालट करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, माती तपासणी ...

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पिकांचा फेरपालट करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, माती तपासणी अहवालानुसार खतांचे नियोजन करणे इत्यादींविषयी माहिती दिली. तसेच ज्या शेतकरी बंधूंना सिंचनाकरिता पाण्याची कमतरता असेल, तर त्यांनी लवकर येणाऱ्या जाती, जसे प्रगती आणि पिडीकेव्ही वायगाव यांची निवड करावी, असे आवाहन केले.

तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी विदर्भातील हळद पिकाची सद्यस्थिती मांडून उत्पादनात प्रचंड तफावत असल्याचे सांगितले. परिसरातील काही शेतकरी प्रतिएकरी ४० क्विंटल उत्पादन घेणारे असताना काही शेतकऱ्यांचे उत्पादन मात्र १८ ते २० क्विंटलपर्यंत मर्यादित आहे. उत्पादनातील ही तफावत कमी करण्याकरिता शेतकरी बंधूंनी आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सादरीकरणात त्यांनी हळद पिकासाठी योग्य जमिनीची निवड, लागवडीची वेळ, बेणे निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण इत्यादीविषयी सखोल मार्गदर्शन केले. हळद हे पीक सेंद्रिय खतांना उत्तम प्रतिसाद देते, त्यामुळे शेतकरी बंधूंनी सेंद्रिय खतांचा वापर करूनच हळद लागवड करावी, असे आवाहन केले.

बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऑनलाईन तसेच यु ट्युब लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगणकतज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.