कोराेनातून सावरल्यानंतर मंदावली भूक, ऑक्सिजन पातळीही कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:36+5:302021-09-19T04:41:36+5:30
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोविड -१९ हा प्राथमिक श्वसनप्रणालीपासून शरीरातील प्रत्येक अवयवांवर परिणाम करतो. गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल लक्षणे जवळपास ६० टक्के रुग्णांमध्ये दिसून ...
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोविड -१९ हा प्राथमिक श्वसनप्रणालीपासून शरीरातील प्रत्येक अवयवांवर परिणाम करतो. गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल लक्षणे जवळपास ६० टक्के रुग्णांमध्ये दिसून येतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतेक कोविड रुग्णांमध्ये स्टोमॅक फ्लूसदृश म्हणजेच मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अतिसारासारखी लक्षणे आढळून आली. एका अभ्यासनुसार कोरोनातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांपैकी ४४ टक्के रुग्णांमध्ये जठर आणि आतड्यांवर गंभीर परिणाम झाला असून, रुग्ण रुग्णालयात दाखल होतेवेळी किंवा कोरोनाची लक्षणे दिसण्यापूर्वी एक महिना अगोदर नाही तर डिस्चार्ज दिल्यानंतर दिसून आली. ०००००००००००००००००००
गंभीर न्यूमोनियानंतर ऑक्सिजन पातळी वाढेना
कोरोना संसर्गात न्यूमोनियाची स्थिती गंभीर झाल्यानंतर रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या प्रमाणात मोठी घट येते. त्यामुळे कोरोनातून सावरल्यानंतरही ३ ते ४ महिन्यांनीही ऑक्सिजन पातळी ९४ ते ९५ च्या आसपासच असल्याचा प्रकार अनेक रुग्णांत दिसून येत आहे. तथापि, घाबरण्याचे काेणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
--------------
कोट : दीर्घकाळ कोरोनावर उपचार घेतल्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांत भूक मंदावण्यासह ऑक्सिजन पातळी जवळपास ३ ते ४ महिनेही ९५ पर्यंतच राहते; परंतु त्याला घाबरून जाण्याचे कारण नाही. शरीराची प्रतिकारशक्ती पूर्ववत होऊन ऑक्सिजन पातळीही पूर्वीप्रमाणे स्थिरावते. ३ ते ४ महिने मात्र अति परिश्रम करणे टाळावे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
००००००००००००००००००००००००००
कोट : मला कोरोना संसर्ग झाल्यानंतर जवळपास १५ दिवस रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. आजारातून सावरल्यानंतर आता पूर्वीच्या तुलनेत भूक मंदावली असून, थकवाही येत आहे.
- सुखदेव राजगुरू
००००००००००००००००
कोट: एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालो; परंतु आता आजारातून सावरून चार महिने उलटले तरी ऑक्सीजन पातळी ९५ पर्यंतच राहते. शिवाय भूकही पूर्वीसारखी लागत नाही.
-विठ्ठल टोपले,