- नाना देवळे मंगरुळपीर : गेली अनेक वर्षांपासून निसर्गाच्या समतोल बिघडल्याने पर्जन्यमानात मोठी घट होत आहे. त्यामुळे दरवर्षी अनेकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन शासनाने वेळीच उपाययोजना करने गरजेचे आहे, मात्र शासन ऐनवेळी व संथगतीने उपाययोजना करीत असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे, मंगरुळपीर तालुकयात असे काही चित्र असून तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांच्या पाण्यासाठी रांगा लागताना दिसून येत आहेत. ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला, तरी गेली अनेक वर्षांपासून विनापरवाना पाण्याचा वारेमाप उपसा होत असल्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे , त्यामुळे उन्हाळ्यापुर्वीच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणाºया योजनावरील कूपनलिका पुर्णत: तळाला गेल्या आहेत,. याशिवाय परिसरातील नदी, नाले , विहिरी कोरडया पडल्या आहेत, . त्यामुळे अनेक गावाचा पाणीपुरवठा प्रभावीत होऊन ग्रामस्थांला मजुरीचे कामे बाजूला सारुन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . परिणामी पाणी दूरवरून आणावे लागत असल्याने पूर्ण दिवस पाणी आणण्यासाठी जातो. त्यामुळे अनेक समस्याला सामोर जावे लागते. पाणीटंचाई तीव्रता ही बाब लक्षात घेऊन शासनाने यावर तात्काळ उपाय योजना करणे आवश्यक असताना पाणीटंचाई उपाययोजना काम संथगतीने होत असल्याचे दिसून येत आहे . जनतेची गरज लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमध्ये केली जात आहे.मंगरुळपीर तालुक्यातील ११६ गावापैकी २९ गावाने जलस्तोस्त्र अधिग्रहण साठी पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहे. यामध्ये शेंदुरजना मोरे,लाठी झाडगाव, जांब प्लॉट, पिंप्री अवगण, आजगाव, माळशेलु,शेगी, मजलापूर, खापरी, पोटी, चीचखेडा, चेहेल, स्वासीन, रहित, धानोरा बु,सालंबी, वसंतवाडी, मोझरी, चांभई, जोगलदरी, पारवा, अरक, चिंचाळा, बोरवा, शिवनी रोड, धोत्रा, जांब, मसोला, पिपळखुटा, गोलवाडी, ईचा, पिप्री अवगण, जनूना, बालदेव, कोठारी तर टँकरकरीता प्रस्ताव करिता बिटोडा भोयर, कळंबा बोडखे, धानोरा खु, सनगाव, सोनखास, शहापूर, या गावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे पाठविला आहे. यापैकी २९ विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव तहसील विभागाने मंजूर केला आहे, परंतु अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे ग्रामास्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तलावाची घटलेली पाणीपातळी मोतसावंगा २२.३५, सिंगडोह मृतसाठा, सावरगाव एलएएल खाली, कोलंबी एल.एस.एल. खाली, जोगलदरी १४.८५, कासोळा १२.३, चांदई कोरडा, दस्तापुर ११,५० पाणी पातळी असून नादखेडा, चोरद , मोहरी, पिप्री , स्वासीन, साशीर्, कवठळ , पिप्री बु, , सार्शी १ हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. येत्या काही दिवसांनी ज्यामध्ये जलसाठा आहे तेही कोरडे पडणार असल्याचे चिन्ह आहे. मागणी केलेल्या गावाचा प्रस्ताव वरिष्टकडे पाठवला आहे मंजूर होताच पाणी पुरवठा करण्यात येईल.तशा उपाय योजना करण्यात येत आहेत.- ज्ञानेश्वर टाकरस, गटविकास अधिकारी, मंगरुळपीर
मंगरुळपीर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई; पाण्यासाठी रांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 2:05 PM