कोरोना काळात जिल्हा प्रशासनाच्या पशू विभागाला आडमुठ्या धोरणामुळे लसीकरण मोहीम बंद पडली असून याचा फटका मुक्या जनावरांना बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनावरांना तोंडखुरी व पायखुरी (लाळ्या खुरकूत) संसर्गजन्य रोग मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पशुपालक हातास झाला आहे. या रोगामुळे अनेक जनावरे आजारी पडली असून हा रोग संसर्गजन्य असल्याने अनेक जनावरांना होऊ शकतो. यामुळे पशू विभागाने तातडीने लसीकरण चालू करावी. आमची मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष पशुपालक यांना सोबत घेऊन जनावरांसहित पशू विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करेल यास शासन जबाबदार राहील, असा आक्रमक इशारा राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा वाशिमच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी योगेश नप्ते पाटील, युवा नेते राधेश्याम कष्टे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गावंडे व उमेश मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जनावरांना तोंडखुरी व पायखुरीचे लसीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:29 AM