वाशिम : यंदा वाहन बाजारात तेजी असून, ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ झाली. दुसरीकडे मध्यंतरी लाॅकडाऊनमुळे कंपन्या बंद असल्याने मागणीच्या तुलनेत ट्रॅक्टरचा पुरवठा होत नसल्याने पश्चिम वऱ्हाडात ग्राहकांना वेटींगवर राहावे लागत आहे. मागणीच्या तुलनेत कंपनीकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याचे ट्रॅक्टर वितरकांनी सांगितले.शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक साधनांची जोड देऊन कमी वेळेत जास्त मशागत करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये म्हणून अनेक शेतकरी हे विविध कंपनीच्या ट्रॅक्टरला पसंती देत असल्याचे दिसून येते. यंदा कोरेानामुळे एप्रिल ते मे या महिन्यात उद्योगधंदे, कंपन्या ठप्प होत्या. त्यामुळे उत्पादन होउ शकले नाही. यावर्षी वाहन बाजारात तेजी असून, मध्यंतरी कंपन्या ठप्प असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. परिणामी, पसंतीचे ट्रॅक्टर मिळण्यासाठी ग्राहकांना वेटींगवर राहण्याची वेळ येत असल्याचे चित्र पश्चिम वऱ्हाडात दिसून येते. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावरही अनेक शेतकऱ्यांना पसंतीचे ट्रॅक्टर घरी नेता आले नाही.
कोरोनामुळे मध्यंतरी ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या ठप्प होत्या. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याचे अलिकडच्या काळात दिसून येत आहे. दसऱ्याच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांना पसंतीचे ट्रॅक्टर मिळू शकले नाही. ट्रॅक्टरसाठी ग्राहकांना वेटींगवर राहावे लागत आहे.- रवी पाटील डुबेट्रॅक्टर वितरक, वाशिम